श्री .संजय राजाराम पवार प्रशासक ९७६३८१२७७७
श्री .अशोक छबू दाते ग्रामपंचायत अधिकारी ९८६०५८१९८५
ग्रामपंचायत इतर विभाग कर्मचारी
१.योगेश रामकृष्ण जाधव शिपाई ९७६७७१४०४१
महसूल व इतर समन्वय कर्मचारी
श्री विशाल हरी मडके ग्राम महसूल अधिकारी ८४४६३९३०१०
श्री .योगेश रामकृष्ण जाधव BLO ९७६७७१४०४१
श्री .लक्ष्मण विष्णू आहेर पोलीस पाटील ९४२२९७०६६७
श्रीमती छाया कांबळे सहय्यक कृषी अधिकारी ७२४९६६८३२८




ग्रामपंचायत देवपूरची माहिती
ग्रामपंचायत देवपूर हे स्थानिक प्रशासनाचे एक महत्त्वाचे अंग आहे, जे गावाच्या विकासासाठी कार्यरत आहे. आम्ही लोकांच्या गरजा आणि अपेक्षांवर लक्ष केंद्रित करतो.
आमचा उद्देश
आपली सेवा
आमचा उद्देश गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आहे. आम्ही स्थानिक लोकांच्या समस्यांवर लक्ष देऊन त्यांना योग्य सेवा प्रदान करतो.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखल
जन्मनोंददाखला
मृत्युनोंददाखला
विवाहनोंदणीदाखला
दारिद्यरेषेखालीलअसल्याचादाखला
ग्रामपंचायतयेणेबाकीदाखला
निराधारअसल्याचादाखला
नमुना८चाउतारा


गावाविषयी माहिती
देवपूर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १६२४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
देवपूर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत भरपूर घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचव ९ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
देवपूर गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श विकसनशील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते


2) भौगोलिक स्थान
देवपूर हे गाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५४ कि.मी तर निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ३८०.हेक्टर असून ग्रामपंचायतीमध्ये ०३वार्ड आहेत. एकूण २८७ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १६२४ आहे. त्यामध्ये पुरुष८४१ व ७८३ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्ण कटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः३८से. ते ४० से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ५से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६०ते७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
देवपूर गाव द्राक्ष,सोयाबीन ,मका व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.


लोकजीवन
देवपूर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेती सह काही लोकदुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात.
वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूर्जाना विशेष महत्त्व आहे.येथील लोकमेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्यगटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
देवपूर लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
४ ) लोकसंख्या
पुरुष-881 स्रिया-783 एकूण-1624


५) संस्कृती व परंपरा
देवपूर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजा अर्चा व साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावनादृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी सारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुले, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळयांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपताना नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो स्वयंसहाय्यगटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.देवपूर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
हनुमान मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
जुने गावठाण येथे आंबट चिंचेचा मळा असून गावातील जुन्या आठवणीला हे स्थान लोकप्रिय बनवते


शिक्षण विभाग
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपूर युडायस नंबर :-२७२०१००२४०१
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली ६ २ ८
दुसरी ४ ४ ८
तिसरी ३ ५ ८
चौथी २ ७ ९
एकूण १५ १८ ३३
शिक्षक माहिती
श्री.हेमंत दिनेश गायकवाड मुख्याधापक ९८८१७६६९६९
श्री अनिल मधु गावित शिक्षक ८८८८०६०४०३


अंगणवाडी विभाग
अंगणवाडी मुले मुली माहिती अंगणवाडी कोड :-२७५१६१७०१०५ (गावातील )
२७५१६१७०१०६ (महादेव मंदिर )
अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी केंद्र १ २९ २४ ५३
अंगणवाडी केंद्र २ ३७ २५ ६२
अंगणवाडी सेविका माहिती
सौ .कल्पना पुंडलिक जाधव अंगणवाडी सेविका ७०६६३७९१८७
सौ . वृंदा ज्ञानेश्वर शिरसाठ मदतनीस ९६५७२६१४६३
सौ.संगीता अंबादास अहिरे अंगणवाडीसेविका ७०६६३७९१८८
सौ .निशा सुर्यकांत अहिरे मदतनीस ९५२७५४८८९३


अंगणवाडी विभाग
अंगणवाडी मुले मुली माहिती अंगणवाडी कोड :-२७५१६१७०१०५ (गावातील )
२७५१६१७०१०६ (महादेव मंदिर )
अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी केंद्र १ २९ २४ ५३
अंगणवाडी केंद्र २ ३७ २५ ६२
अंगणवाडी सेविका माहिती
सौ .कल्पना पुंडलिक जाधव अंगणवाडी सेविका ७०६६३७९१८७
सौ . वृंदा ज्ञानेश्वर शिरसाठ मदतनीस ९६५७२६१४६३
सौ.संगीता अंबादास अहिरे अंगणवाडीसेविका ७०६६३७९१८८
सौ .निशा सुर्यकांत अहिरे मदतनीस ९५२७५४८८९३


आरोग्य विभाग
डॉ .सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी ९४२२७५७५६५
डॉ .कल्याण शिंदे PHC वैद्यकीय अधिकारी
रिक्त
उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी
श्रीमती रुपाली शिवाजी सालके आरोग्य सेविका ९५४५२०६४१७
श्री नयन दिगंबर पगारे आरोग्य सेवक ९०२८१६०८३८
सौ .संगीता विजय आगळे आशा वर्कर ७३५०२७४४६१


स्त्री स्वयं सहाय्यता गट
१वैष्णवी महिला स्वयंसहायता समुह
कादवा महिला स्वयंसहायता समूह
रेणुका महिला स्वयंसहायता समूह
राधाकृष्ण महिला स्वयंसहायता समूह
नवदुर्गा महिला स्वयंसहायता समूह
रमाई महिला स्वयंसहायता समूह
अहिल्याबाई महिला स्वयंसहायता समूह
साई महिला स्वयंसहायता समूह
प्रगती महिला स्वयंसहायता समूह
माऊली महिला स्वयंसहायता समूह
मातोश्री महिला स्वयंसहायता समूह
कुलस्वामिनी महिला स्वयंसहायता समूह
रेणुका महिला स्वयंसहायता समूह
सर्वज्ञ महिला स्वयंसहायता समूह
शिवकन्या महिला स्वयंसहायता समूह
पंचदीप स्वयंसहायता समूह(दिव्यांग )


ग्रामपंचायत प्रकल्प
ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती.


सामुदायिक विकास
ग्रामपंचायतीच्या विकासासाठी उपक्रम.






शिक्षण व कृषी
शिक्षण व कृषी विकासातील प्रकल्प.
